
"आनंदवन"- स्वामी निवास
मध्ये आपले स्वागत आहे
स्वामी निवास


संस्थाचालकांच्या आंतरिक इच्छेनुसार आणि सर्व ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरातून आणि काळाची गरज म्हणून ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी साकारलेल्या आजी-आजोबांच्या निखळ आनंदासाठी,
१४ फेब्रुवारी २०२२ पासून कार्यान्वित झालेल्या 'आनंदवनात' आपले सहर्ष स्वागत.
६० वर्षांवरील शारीरिक दृष्ट्या सक्षम महिला आणि पुरुष यांसाठी किर्ती अमृतानंद सेवा संस्थेचा हा उपक्रम.

स्थान
आव्हाटे गावातील आरोग्यदायी प्रदूषणमुक्त वातावरणात 'आनंदवन', आमच्या लाडक्या ज्येष्ठांसाठी आमचे आरामदायक घर आहे. हे वैतरणा 2 तलावाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीत वसलेले आहे, जिथे तुम्ही लँडस्केप फार्ममध्ये लागवड केलेल्या स्थानिक फळे आणि फुलांसह या प्रदेशातील जैवविविधतेचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यातील सुंदर झरे आणि ढगांसह सर्व ऋतूंमध्ये निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या.
आव्हाटे हे गाव त्र्यंबकेश्वर पासून २५ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर खोडाळा ( टाके हर्शा - खोडाळा) ह्या एस. टी. रोडच्या मार्गावर व घोटी पासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे. आनंदवन हे मुख्य रस्त्यापासून २५० मीटर आत आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांपासून नाशिक त्र्यंबकेश्वर घोटी आणि इगतपुरी येथे राज्य परिवहन रेल्वे किंवा खाजगी बस सेवेद्वारे व तेथून एस. टी / स्थानिक शेअर टॅक्सी द्वारे आनंदवनात पोहोचता येते.
